
रत्नागिरी नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री वैभव गारवे यांची रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
रत्नागिरी नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री वैभव गारवे यांची रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ व कार्याध्यक्ष डॉ विजय निंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांच्या नगरपरिषदेकडे प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघाच्या प्रलंबित विषयांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे श्री गारवे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले.