
चिपळूण एसटी आगारात एक लाखाची सोन्याची चैन चोरट्यानी लांबविली.
चिपळूण एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवासी गोंधळात चोरट्याने हातचलाखी दाखवत एका महिला प्रवाशाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्याने चोरलेली सोनसाखळी २३ ग्रॅम वजनाची, १५ इंच लांबीची असून, तिची अंदाजे किंमत १ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी शीतल शांताराम चाळके (वय ६०, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, ता. खेड) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.शीतल चाळके या आपली भाची रूची संतोष शिर्के (वय २०) हिच्यासोबत दोनवली-गांग्रई एसटी बस पकडण्यासाठी चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी ९ च्या सुमारास आल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असतानाच चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली.