
खेड रेल्वेस्थानकाचे छप्पर दुरुस्तीचे काम पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू.
खेड रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरणासह स्थानक परिसरातील कॉंक्रिटीकरणाचे काम चर्चेचा विषय बनले आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सुशोभिकरण कामातील गळती अनब रस्ता कॉक्रिटीकरणाला नव्याने ’ठिगळं’ लावण्याच्या प्रक्रियेने १० कोटी रुपये खर्चुन केलेल्या कामाचा सुमार दर्जा समोर आला ’आहे. सातत्याने टीकेची झोड उठल्यानंतर सुशोभिकरण कामातील छप्पर बसवण्यासाठी अखेर यंत्रणेला मुहूर्त मिळाला. शुक्रवारपासून छताचे काम हाती घेण्यात आले आहे.www.konkantoday.com