
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे पोलिसांकडून गोवा बनावटीची दारू जप्त.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ या ठिकाणी संगमेश्वर पोलिसांनी गोवा बनावटीची दारू जप्त केली असून यात गोवा बनावटीच्या दारूसह ६ लाख ६९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतक भरत वाळवे (वय २९, वर्षे, रा. तिवरे डांबरे वाळकेवाडी, ता. कणकवली) हा आपल्या ताब्यातील टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच. ०१/एसी/५६६८ मधून एक लाख ८०० रुपये किंमतीचे गोवा बनावटीच्या दारूचे ११८ बॉक्स घेवून गोवा बनावटीची दारू विनापरवाना व अवैधरित्या आपल्या ताब्यात बाळगून वाहतूक करीत होता.www.konkantoday.com