
ग्रामपंचायतच होणार आता गावातील विकास कामांची ठेकेदार.
खेडेगावातील विकास कामांचा ठेका आता ग्रामपंचायतींना घेता येणार आहे. याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ७५ हजारांहून कमी वार्षिक उत्पन्न असणार्या ग्रामपंचायतींना दहा लाखांपर्यंतची तर ७५ हजारांहून अधिक उत्पन्न असणार्या ग्रामपंचायतींना १५ लाखांपर्यंतच्या विकास कामांचा ठेका घेता येणार आहे. या शासन निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार आहे.या निर्णयाने ग्रामपंचायतींच्या स्वनिधीत वाढ होण्यास मदत होणार आहे. मात्र या संधीचा लाभ घेतला तर सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्थांना मिळणार्या कामांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमार्फत केले जात असते.ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत निधीचे वितरण केले जायचे. मात्र निधी वितरणात असमानता दिसून येवू लागल्यामुळे ग्रामपंचायती बळगट करण्याचा प्रयत्न काही वर्षापासून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. त्यांना जादा अधिकार देण्यात येवू लागले. आता ग्रामपंचायतींच्या स्वनिधीमध्ये वाढ होण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना एजन्सी म्हणून गावातील विकास कामांचा ठेका घेण्याचे अधिकार दिले आहेत. www.konkantoday.com