
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात (SGRH) दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये (IGMC) नेण्यात आले होते. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यातही त्यांना पोटाच्या त्रासामुळे सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.