
सागरी महामार्गावरील काळबादेवी पूल, जोडरस्त्यासाठी सीमांकन पूर्ण.
समुद्री महामार्गादरम्यान रत्नागिरी समुद्रकिनारी होणार्या पुलांसाठी भूसंपादन प्रक्रियेपूर्वी ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर जयगड परिसरातील मोजणी पूर्ण होवून लवकरच जागेचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रियेनंतर लवकरच या पुलांच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.समुद्री महामार्गादरम्यान तालुक्यातील काळबादेवी ते मिर्या आणि जयगड ते गुहागर तालुक्यातील तवसाळ हे दोन खाडी पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलांसाठी आवश्यक जोडरस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भूसंपादन करण्यापूर्वी संबंधित जमिनी नक्की कुठे आहेत व रस्ता नक्की कोणत्या जमिनीतून जाणार, या संदर्भात ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. काळबादेवी परिसरात या पुलासंदर्भात ग्रामस्थांचे दुमत होते. मात्र पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांनतर आता जागेचे सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या परिसराची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com