
लिफ्टसाठी तयार केलेल्या खड्ड्यात मुलाचा मृत्यू, तीन ठेकेदारांवर गुन्हा.
दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असणार्या बांधकामातील लिफ्टसाठी तयार केलेल्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय समीर श्रीकांत चव्हाण या मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संदीप माधवराव पाटील (विटा, जिल्हा सांगली), ताहीर हुसेन तोफिक कोकणे (मिरज), जग्गू (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयांत नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून समीर श्रीकांत चव्हाण या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बांधकामावेळी सुरक्षिततेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्याने एका मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संदीप पाटील, ताहीर हुसेन तोफिक कोकणे, जग्गू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com