
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, झाड कोसळल्याने दापोली दाभोळ मार्ग सध्या बंद
हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे दापोली परिसरात आहे मुसळधार पाऊस पडत असून रस्त्यावर झाड पडल्याने
दापोली दाभोळ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे मुसळधार पाऊस पडत असूनही तातडीने हे झाड तोडण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे मात्र दाभोळकडे जाण्यासाठी छोट्या गाड्यांनी बर्वे आळी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे जालगाव परिसरात हे झाड पडले असून ते बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यानंतरच या मार्गावरून वाहतूक सुरू होईल