मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळण्याचा पुन्हा प्रकार


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

गेल्या महिन्यात सुद्धा या ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीला खोळंबा झाला होता. पुन्हा त्या ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली. जवळपास दीड तासानंतर दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले दरड हटवल्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button