
जून ते ऑगस्ट या चार महिन्यात ३८ दिवस धोक्याचे, तीन महिन्यात ३४ दिवस हाय टाईड.
या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या चार महिन्यात ३८ दिवस धोक्याचे आहेत. या दिवशी समुद्राला मोठे उधाण येणार असून अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र आणि गाडी किनार्यावरील गावांना उधाणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.पावसाळ्यातील उधाणाचे दिवस हे किनारपट्टीवरील गावांसाठी परीक्षा घेणारे ठरतात.
मुसळधार पाऊस पडल्यास पूरस्थिती निर्माण होते. जिल्ह्यात अनेकदा असे प्रसंग निर्माण झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील समुद्राला येणार्या भरती ओहोटीचा अभ्यास करून उधाणाने संभावित हानी टाळण्यासाठी प्रयत्न करते. हायटाईडची माहिती हवामान खात्याच्या रिपोर्टमध्ये दिली जाते आणि ती किनारपट्टीवरील लोक, मच्छिमार आणि पर्यटन उद्योगासाठी महत्वाची ठरते.www.konkantoday.com