
खाजगी दवाखान्यात रुग्ण हक्क सनद, दरपत्रक तपासणी करण्याचा निर्णय.
खासगी रुग्णालयात उपचार घेताना रूग्णांना त्यांचे हक्क माहिती व्हावेत, तसेच विविध उपचारांची त्यांना दरपत्रकाव्दारे माहिती मिळावी, तसेच याबाबत जनजागृती होण्यासाठी रत्नागिरी येथे रत्नागिरी पालिका आणि साथी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण हक्क व जबाबदार्या कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी रत्नागिरीतील खाजगी दवाखान्यात रूग्ण हक्क सनद, दरपत्रक तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय झाला.या कार्यशाळेत ७५ हुन अधिक लोक सहभागी झाले होते. रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, संस्था संघटनांचे प्रतिनिधी, सरपंच, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी मान्यवर म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप, रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, उपमुख्याधिकारी मयूर बेहरे, स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे व प्रमित जाधव उपस्थित होते. या वेळी डॉ. जगताप म्हणाले, खाजगी दवाखान्यातील रुग्णांच्या तक्रारींसाठी टोल फ्री नंबरची प्रक्रिया चालू आहे. मी माझा नंबर देतो सगळ्यांना आणि त्यावर तक्रार येतात. सर्व दवाखान्यात दर पत्रक लागलेले आहेत. सहभागींचा सक्रिय सहभाग होता. पुढे रत्नागिरीत खाजगी दवाखान्यात रुग्ण हक्क सनद व दरपत्रक तपासणीची मोहीम करण्याचे ठरले. तसेच ट्रस्ट हॉस्पिटल निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी २० टक्के खाटा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, अंतर्गत पाच लाखांपर्यंत उपचाराचा खर्च महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो. याबद्दलही माहिती देण्यात आली.www.konkantoday.com




