
कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी, जिल्ह्यातील १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला.
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार्या २०२४-२५ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने नुकतीच करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्यातील १ ग्रामीण रुग्णालय, १९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११६ आरोग्य उपकेंद्र आणि १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे.www.konkantoday.com




