
कराड चिपळूण महामार्गावरील बांधकाम सुरू असणाऱ्या पुलाच्या शेजारील पर्यायी रस्ता डोंगरातून आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला,बसचा अपघात
पश्चिम घाट परिसरातील कोयना नगर मध्ये पावसाने रात्रीपासून जोर धरला आहे. कराड चिपळूण महामार्गावरील बांधकाम सुरू असणाऱ्या पुलाच्या शेजारील पर्यायी रस्ता डोंगरातून आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला आहे.त्यामुळे कराड चिपळूण महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाचे काम रखडलं आहे.. पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे डोंगरावरून येणाऱ्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने महामार्गाला घातलेला भराव देखील यामध्ये वाहून गेला आहे.दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणला जोडणाऱ्या कराड-चिपळूण महामार्गावर बसचा अपघात झाला आहे. महामार्गाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने महामार्गावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात झाला आहे.एसटी आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन एसटी नाल्यात गेली असून या अपघातात आठ जण प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मोठ्या प्रमाणावर एसटी बसचे नुकसान झाले. गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात सुरू आहे. 24 तासात 104 मिलिमीटर पावसाची नोंद कोयना भाग परिसरात झाली आहे.