
राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचलीराजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे.त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजकोटवरील नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. आता महिनाभरातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली आहे. त्यामुळे पुतळ्याला लागूनच असलेली जमीन काही प्रमाणात खचल्याचं दिसून आलं. या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या चबुतऱ्याची बाजूची जमीन खचली आहे. पण महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.