
चिपळूण येथील भाऊ कार्ले यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर
चिपळूणमधील हौशी नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना भावना बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नाशिक यांचा सन २०२४ साठी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला असून भाऊ कार्ले हे सन १९८२ पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी विविध राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे पस्तीस वर्षे आयोजन केले असून दैनिक सागरतर्फे १९९० च्या दशकात राज्य नाट्य स्पर्धेचे समीक्षण लिहिले असून, स्वतः एकोणीस एकांकिका व एक नाटकाचे लिखाण केले असून ते सर्व सेन्सॉर संमत आहे. त्यांना विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये लेखन, दिग्दर्शन व अभिनयाची सुमारे २९० पारितोषिके व दहा राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे रंगकर्मी ग्रुप व सर्वस्तरीय नागरिकांनी त्यांचे खास अभिनंदन केले असून या यशाचे सर्व श्रेय ते रंगकर्मी व त्यांच्या पत्नी सौ. रूपा कार्ले, मुलगी डॉ. गायत्री साने व मुलगा वेदांत यांना नम्रपणे समर्पित आहे, असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com