देवरुख पोलास ठाण्याच्या हद्दीत मुर्शी चेक नाका येथेगोवंश वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई”.


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. 13/06/2025 रोजी 20.35 वाजण्याच्या दरम्यान देवरुख पोलीस ठाणे हद्दी मधील साखरपा पोलीस दूर क्षेत्र अंतर्गत मूर्ति चेकपोस्ट येथे नियमित गस्ती दरम्यान एक संशयित बोलेरो पिकप वाहन क्र. MH-08-M-4929 येत असल्याची दिसून आले त्याला देवरुख पोलीस पथकामार्फत थांबविण्यात आले व बोलेरो पिकप हौद्याची अधिक तपासणी केली असता त्यामध्ये दोन बैल जवळजवळ बांधलेले दिसून आले.
या वाहनावरील चलकाची तसेच इतर इसमांची अधिक चौकशी केली असता आरोपी क्रमांक 1)सागर नामदेव पाटील याने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकप गाडी क्र. MH-08-M- 4929 मध्ये दोन गोवंश जनावरे वाहनात हालचाल करता येणार नाही व त्यांना वेदना होतील अशा प्रकारे आखूड दोरीने मानेला बांधून गाडीचा हौदा चारही बाजूने ताडपत्रीने बंदिस्त करून तसेच गुरांना दुखापत होऊ नये म्हणून गुरांसाठी विभाजन न करता व गुरांची वैद्यकीय तपासणी न करता गुरे हे खरेदी विक्रीचा तसेच वाहतुकीचा परवाना नसताना तसेच सध्या गाडीचा वापर करणारा आरोपी क्रमांक 2) प्रदीप अरुण लाटवडेकर रा. पिशवी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर व बैलमालक आरोपी क्रमांक 3) नागेश कदम रा. देवरुख बौद्ध वाडी यांच्या सांगण्यावरुन ही दोन्ही गुरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा बिगर परवाना अवैधपणे वाहतूक करून साखरपा पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत मूर्शी चेकपोस्ट येथून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावर देवरूख पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजिस्टर नंबर 66 / 2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5(अ), 5 (ब) व 9 सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 1] (1), (घ), (ङ), (च) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, 3/181 प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47,48,49,50,51,54,56 भा. न्या. सं 2023 चे कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु असून गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 ) सागर नामदेव पाटील वय 31 वर्षे, व्यावसाय – चालक, रा. पिशवी केळेवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर याला भारतीय नागरीक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे तसेच आरोपीत क्रमांक 2) प्रदीप अरुण लाटवडेकर रा. पिशवी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर व बैल मालक आरोपी क्रमांक 3) नागेश कदम रा. देवरुख बौद्ध वाडी यांच्यावर देवरूख पोलीस ठाणे मार्फत कारवाई करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button