
कापसाळ येथे बिघडलेल्या ट्रेलरवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार
मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे बिघडलेल्या अवस्थेत थांबलेल्या ट्रेलरवर भरधाव वेगाने आदळून एक तरुण जागीच ठार झाला आहे. सिद्धेश दिलीप कवलकर (वय 22, टेरव तांबडवाडी) असे त्याचे नाव आहे.सिद्धेश कवलकर हा सावर्डे येथे स्लाईंडचे काम करत असे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातून गावी आलेल्या सिद्धेशने सावर्डे येथे स्लायडिंचे काम सुरू केले होते. रात्री काम संपवून त्याला टेरव फाटा येथे सोडले. तेथून तो आपली दुचाकी घेऊन चिपळूणच्या दिशेने येण्यास निघाला होता. महामार्गावर बिघडलेल्या अवस्थेत थांबलेल्या ट्रेलरवर त्याची दुचाकी भरधाव वेगात जाऊन आदळली. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना गुरूवारी रात्री घडली.या प्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.