
रास्त धान्य दुकानातून तीन महिन्यांच्या धान्य वितरणास सुरुवात.
. सध्या येथील रास्त धान्य दुकानांमधून जूनसह जुलै व ऑगस्ट असे तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळत आहे. एकाचवेळी धान्य पॉस मशिनवर वाटपास उपलब्ध करून देण्याची जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटनेची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण केल्याने वाटपाचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे शिधापत्रिकाधारक समाधानी आहेत. मात्र थकीत कमिशन अद्याप न मिळाल्याने दुकानदार नाराज आहेत.पावसाचा वाढता जोर, पूर येण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे धान्य खराब होण्याची शक्यता लक्षात घेता तसे होऊ नये म्हणून यावर्षी जून महिन्यातच पुढील दोन अशा तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र तीन महिन्याचे धान्य दुकानात ठेवण्यास जागा अपुरी आहे.www.konkantoday.com