
गुहागर आगारातील एस.टी. चालकाला कारच्या चालकाकडून मारहाण
गुहागर आगारातील एस.टी. चालकाला एका कारच्या चालकाकडून मारहाण झाल्याची घटना रविवारी तालुक्यातील घोणसरे बस थांब्यावर घडली. याप्रकरणी एस.टी. चालक यांनी चिपळूण पोलीस स्थानकात कार चालकाविरोधात तक्रार दिली आहे.
विशाल अशोक हसबे (गुहागर आगार) असे मारहाण झालेल्या एस.टी. चालकाचे नाव आहे. त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. विशाल हसबे हे गुहागर-मुंबई ही एस.टी. बस घेवून मुंबईकडे जात होते. त्यांची बस घोणसरे येथे आली असता रस्त्यावर असलेल्या चिखलामुळे बसचे चाक घसरून ती बस गुहागरकडे जाणार्या कारला घासली. याच्या रागातून कार चालकाने हसबे यांना एस.टी. बसच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात कारचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com