पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलातील पाण्यावर पांढरा तवंग


चिपळूण येथे पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलवर गुरुवारी सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाणे खडपोली एमआयडीसीतील एखाद्या कंपनीने त्यांचे सांड पाणी या अवजलमध्ये सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मात्र हे पाणी नक्की कोणत्या कंपनीने सोडले, हे सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

सोशल मीडियावर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पाणी नक्की कोणी सोडले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. काहींनी पिंपळी येथे दूरध्वनी करून माहिती घेतली. पिंपळी येथे गुरुवारी सायंकाळी पाण्यावर पांढरा तवंग आल्यानंतर चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागानेही खबरदारीच्या उपायोजना सुरू केल्या.

वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे अवजल वाशिष्ठी नदीला मिळते. चिपळूणमध्ये हे पाणी नगर परिषद उचलते आणि नागरिकांना पिण्यासाठी देते. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता नगर परिषद पाणी उचलणार होते. तत्पूर्वी ही घटना समजल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नगर परिषदेने ते न उचलण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button