ना. उदय सामंत ह्यांचा मास्टरस्ट्रोक !

मा. निलेश सांबरे ह्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !


जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. निलेशजी सांबरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

या ऐतिहासिक क्षणी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.

निलेश सांबरे ह्यांच्या भगवान सांबरे रुग्णालयाच्या उदघाट्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ना. उदय सामंत ह्यांचे अनेक विरोधक व्यासपीठावर एकत्र येऊन निलेश सांबरे ह्यांना ना. उदय सामंत ह्यांच्या विरोधामध्ये उतरविण्याचे मनसुबे आखत होते. परंतु राजकीय आखाड्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उदय सामंत ह्यांनी मास्टरस्ट्रोक मारत आपल्या विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले. ना. उदय सामंत ह्यांनी निलेश सांबरे ह्यांचा मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेत निलेश सांबरे ह्यांना शिवसेनेचे उपनेते पद देखील मिळवून दिले. ह्या प्रवेशामुळे भविष्यात कोकणामध्ये निलेश सांबरे ह्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढीचा प्रयत्न ना. उदय सामंत ह्यांनी केला आहे. निलेश सांबरे ह्यांचा पक्ष प्रवेश हा ना. उदय सामंत ह्यांच्या विरोधकांना मोठा धक्का असल्यामुळे हा पक्ष प्रवेश मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

निलेश सांबरे हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत, गोर गरीबांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून, शिंदे साहेबांचे नेतृत्व अधिक प्रभावी व व्यापक झाले आहे. शिवसेना पक्षाचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक बळकट होतोय, हे परिवर्तनाचं प्रतीक आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button