
रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ जांबारी फाटा येथे चालता ट्रक पेटला
मध्यंतरी राज्यात उन्हामुळे तापमान वाढल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या मात्र काल रत्नागिरी तालुक्यात रात्री चालत्या ट्रकला आग लागण्याचा प्रकार घडला आहे
रत्नागिरी तालुक्यातील जयगड मधील जांभारी फाटा येथे सैतावडे ते खंडाळा रोड वर चालता आयशेअर ट्रक अचानक पेटला ग्रामस्थांनी घटनास्थळी गाव घेतली याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यावर
तातडीने अग्निशामक दल दाखल झाले आणि आग विझवली ट्रक मधील वायर मध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी असा अंदाज आहे या घटनेमध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही