मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे थांबलेली वाहतूक अखेर सुरू


*माणगाव परिसरात दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली होती


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना माणगाव येथे अलीकडे ब्रिजजवळ एका मालवाहू अवजड वाहनाच्या धडकेने मोठी अवजड वाहनांना जाता येऊ नये त्यासाठी लावण्यात आलेला गर्डर मोठ्या अवजड वाहनाच्या धक्क्याने पडला होता.कोणीतरी याही परिस्थितीत अवजड वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याने हा अडथळा सदृश्य गर्डर पडला आहे. त्यामुळे सुमारे एक तासाहूनही अधिक काळ वाहतूक खोळंबली होती त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्गावर माणगाव येथे थांबलेली वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते .अडथळा सदृश्य गर्डर हा गॅस कटरने तोडण्यात आल्याने ही वाहतूक सुरळीत झाली आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button