दापाेलीत महसूल मंडळात विविध दाखले शिबिरांस प्रारंभ…

दापाेली तालुका महसूल – विभागाकडून विविध दाखल्यासाठी दाखले शिबिरांस प्रारंभ झाला आहे. हे शिबीर 20 जून पर्यंत विविध – नियाेजनानुसार त्या-त्या महसूल मंडळात सुरू राहणार आहेत. शेतकरी, महिला, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांच्या तक्रारींचा निपटारा या माध्यमातून केला जाणार आहे. गावा-गावात महसूल विषयक विविध सेवा तसेच विविध दाखले, अ‍ॅग्रीस्टॅक (शेतकरी नाेंदणी) आदीसाठी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत तालुक्यातील क्षेत्रीयस्तरावर या शिबिराचे अयाेजन करण्यात आले आहे. प्रत्येक मंडळाच्या समावेश असलेल्या गावांसाठी त्या-त्या मंडळात हे शिबीर पार पडणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलकडून करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button