गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलीजगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट▪️देहदान उपक्रमाचे केले कौतुक.

पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओल्ड गोवा येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची आज सदिच्छा भेट घेतली. जगद्गुरूंच्यासुरू असलेल्या देहदान आणि अवयवदान उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचे गेले काही दिवस संस्थानच्या उपपीठ परभणी, तेलंगणा, बेंगलोर येथे कार्यक्रम झाले. त्यानंतर आता आज त्यांचा प्रवचन दर्शन सोहळा ओल्ड गोवा येथील उपपिठावर शिवमंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.आज सकाळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे येथे उत्साहात आगमन झाले. उपस्थित भाविकांनी जयघोष केला. यावेळी लहान मुलानी वायुपुत्र हनुमानाचे रूप घेतले होते. जगद्गुरुश्री यांनी या मुलांचे कौतुक केले. या छोट्या हनुमानांनी ” जय सियारामा”च्या घोषणा दिल्या. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांचा ओल्ड गोवा उपपीठ येथील मंदिरात प्रवेश करताच सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. पूजाविधीनंतर प्रवचन व दर्शन सोहळा सुरू झाला. आजच्या सोहळ्यास गोव्यासहीत सिंधुदुर्ग, जोयडा. उत्तर कन्नड पूर्व व पश्चिम, बेळगाव, कारवार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. गोवा पोलिसांनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या भेटीला आले. त्यांनी दर्शन घेतले. उभयतात चर्चा झाली. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आत्तापर्यंत ११८ जणांनी मरणोत्तर देहदान केले, तर ३० जणांनी अवयवदान केले आहे. त्याबाबत त्यांनी महाराजांचे कौतुक केले.फोटो ओळी – १) ओल्ड गोवा येथे गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जगद्गुरुश्री यांची भेट घेतली.२) हनुमानाचे रूप घेतलेल्या चिमुकल्यांचे कौतुक करताना जगद्गुरुश्री.३) ओल्ड गोवा येथे गुरुवारी जगद्गुरुश्री यांचे औक्षण करताना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button