
एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा पहिला व्हिडीओ आला समोर
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. उड्डाण केल्यानंतर 15 किमी अंतरावरच विमान रहिवासी विभागात कोसळलं. मेघानी परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहेविमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटना किती भयानक होती हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये विमान खाली जमिनीवर कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा दिसत आहे. यावरुनच ही दुर्घटना किती मोठी आहे याची कल्पना येत आहे.अपघाताचे कारण आणि नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही वेळातच ते मेघानीनगर परिसराजवळ कोसळले. मेघानीनगर हे विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.