
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे ऐक्य महत्वाचे -सुनिल तटकरे यांचे मत.
आठ वर्षाच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर राज्यात महापालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्याअखेर होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील विविध जिल्हा परिषदा, नगर पालिका, महानगरपालिका, यांच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत महायुतीचे ऐक्य व सरकारचे कामकाज हे आमच्या अग्रक्रमाचे विषय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.रविवारी कोलाड सुतारवाडी येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना महायुती म्हणून सामोरे जात असताना महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचा परस्पर समन्वय हा महत्वाचा असल्याने तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची समन्वय समिती या बाबतचे निर्णय पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाने घेणार आहे. निवडणुकीत महायुतीचे ऐक्य अबाधित ठेवूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका यामध्ये भिन्न भिन्न राजकीय परिस्थिती आहे.www.konkantoday.com