
शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले
शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी आज बंद पाडले
नांदिवडे येथील गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. पण त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले कंपनीच्या या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
प्रशासनाच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावणाऱ्या जिंदाल कंपनीवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.