
महामार्गाच्या कामामुळे 11 ते 22 जून अवजड वाहनांची वाहतूक खेड दस्तुरीमार्गे पालगड सोंडेघर मार्गे दापोलीकडे
*रत्नागिरी,: खेड-दापोली राज्य मार्ग क्र.162 या मार्गाचे नव्याने काम चालू असल्याने दि.11 जून ते 22 जून 2025 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक ही खेड दस्तूरी मार्गे पालगड सोंडेघर मार्गे दापोलीकडे व दापोलीकडून खेडकडे जाणारी अवजड वाहने ही दापोली- सोंडेघर –पालगड दस्तूरीमार्गे खेडकडे वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
तसेच फुरुस येथील पुलाचे रिर्टन वॉलचे काम करण्यासाठी आणि पाण्याचा प्रवाह पूर्ण झालेल्या पुलामधून वळविण्यासाठी दि. 11 जून व 12 जून 2025 रोजी सर्व प्रकारची वाहतुक खेड दापोली मार्गावरील फुरुस येथील पुलाच्या ठिकाणी बंद करण्यात यावी. वाहतूकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
000




