
दापोली तालुक्यातील टेटवली मोहल्ला येथे मगरीची नैसर्गिक अधिवासात मुक्तता.
दापोली तालुक्यातील टेटवली मोहल्ला मुख्य रस्ता ब्रिजखाली आलेली मगर वनविभागाचे रेस्क्यू पथकाने सुरक्षित ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात मुक्त केली.टेटवली येथील मोहल्ला लोकवस्तीनजिक ब्रिजखाली पाण्याच्या डोहानजिक मगर येवून बसल्याची माहिती सरपंच मोबील टेटवलकर यांनी वनविभागास दिली होती. सदर ठिकाणी लहान शाळकरी मुलांचा व नागरिकांचा वावर असल्याने तिला ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आवश्यक होते. सदरची कामगिरी वनपाल दापोली श्री. रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, सुरज जगताप, प्रभू साबणे, तसेच वाईल्ड ऍनिमल रेस्क्यूअर टिमचे श्री. तुषार महाडीक, मिलिंद गोरीवले यांचे पथकाने वनक्षेत्रपाल दापोली, वनविभाग वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) प्रादेशिक यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडले.www.konkantoday.com