
चिपळूण ’नॅब’ने गाठला ७५ हजार शस्त्रक्रियांचा टप्पा.
नॅशनल असोसिएश फॉर दि ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा रत्नागिरी संचलित चिपळूण येथील नॅब आय हॉस्पिटलने ७५ हजार नेत्र शस्त्रक्रियांचा टप्पा ९ जून रोजी यशस्वीपणे पूर्ण केला. सन १९९५/९६ मध्ये ९७ नेत्र शस्त्रक्रियांनी सुरू केलेले ध्येय आज ७५ हजार नेत्र शस्त्रक्रियांच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये ३३,५००पेक्षा अधिक शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. याचा लाभ जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील रुग्णांना मिळाला आहे. नॅब आय हॉस्पिटलमध्ये नेत्रतपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, रेटीना उपचार, तसेच ऑकीलोप्लास्टी (तिरळेपणा, पापणी पडणे इत्यादी) असे विविध उपचार एकाच छताखाली सवलतीच्या दरात मिळत आहेत.
रुग्णालयामध्ये ४ निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच ४ व्हीजिटींग तज्ञ डॉक्टर कार्यरत असून त्यांना रुग्णालयातील कर्मचार्यांची साथ आहे. सन १९९५-९६मध्ये १००० स्क्वेअर फूट एवढ्या लहान जागेत सुरू झालेले रुग्णालय आता १३००० स्क्वेअर फूट एवढ्या प्रशस्त जागेत जिल्हातील रुग्णांची सेवा करत आहे. तसेच नॅबतर्फे जिल्ह्यातील दृष्टीबाधित बांधव व भगिनींना शैक्षणिक, स्वयंरोजगार, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. नॅबतर्फे अंध बांधव भगिनींना नॅब युनिट महाराष्ट्र व नॅब इंडिया तर्फे घेतल्या जाणार्या विविध प्रशिक्षणांसाठी पाठवण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील विविध प्राथमिक तसेच माध्यमिक शाळातील विद्यार्थी, शिक्षक व शासकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.www.konkantoday.com