
कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक वन-वे विशेष गाडी सोडण्याची घोषणा.
निसर्गरम्य असलेले कोकण आणि गोव्याचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. पावसाळ्यातील हे निसर्गसौंदर्य प्रवाशांना अनुभवता यावे, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक वन-वे विशेष गाडी सोडण्याची घोषणा केली आहे. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी या गाडीला एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे.कोकण रेल्वे मार्गावर दि. १४ जूनला मुंबई सीएसएमटी ते मडगांव जंक्शन वन वे विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीला चेअर कार, सेकंड सीटिंग या डब्यांसोबत एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबेल.www.konkantoday.com