
CCTV मध्ये थरार कैद! टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला चिरडलं, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ.
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील वीसापूर टोल नाक्यावर अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल भरायला नकार दिल्यानंतर टाटा एस मिनी ट्रकचालकाने थेट टोल कर्मचाऱ्यावर गाडी घातली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, गंभीर जखमी कर्मचाऱ्याचा खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना रविवारी रात्री सुमारास घडली. बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणारी टाटा एस वाहन चालक टोल बचावण्याच्या उद्देशाने थेट लाईन क्रॉस करत टोल न भरता पुढे जात होता. यावेळी टोल ऑपरेटर संजय अरुण वांझारे (वय- 27) यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी संजय यांच्या अंगावर गाडी घालून दिली. यात संजय गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत