
सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर शिवाजीराव मानकर यांचे दुःखद निधन.
पोफळी येथील येथील नामवंत होमिओपॅथी डॉक्टर शिवाजीराव मानकर यांचे काल मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यातील व पोफळी पंचक्रोशीतील एक हरहुन्नरी, सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.डॉ. मानकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत सामाजिक क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली होती. अत्यंत मनमिळावू, नम्र आणि सेवाभावाने कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टर मानकर गेलीअनेक वर्ष रत्नागिरी शहरातही सेवा देत होते.