
माजी सभापती विनोद झगडे यांचा शिवसेनेत प्रवेश.
आज ठाणे येथे माजी सभापती विनोद झगडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारून पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह बाळासाहेब शिंदे, प्रसाद लाड, सचिन बामणे, सुधीर कदम, सतीश शिंदे, सुरेश गोलमडे यांचासह साठ पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.या ऐतिहासिक पक्षप्रवेशासाठी 100 गाड्यांचा भव्य ताफा घेऊन झगडे समर्थकांनी मुंबईत धडक दिली.

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना म्हणजे लोकांशी जोडणारा आत्मविश्वास!शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत परिवर्तनाची सुरुवात झाली असून या प्रवेशामुळे रत्नागिरीतील शिवसेनेचे ताकद वाढली असून शिंदे साहेबांचे बळ अधिक वाढणार आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.या सोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, रोहन बने यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.