
भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले.
लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी कोलाड येथे झालेल्या कार्यक्रमात स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केला.8 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, स. तु. कदम, महेश केकाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी, संदीप राजपूरे, तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, हरेष मर्चंडे, सतीष दिवेकर, प्रकाश भुवड, पराग करमरकर आदी उपस्थित होते.