गुहागरमध्ये अपघाती मृत्यू : टेरेसवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अडखोल येथील रहिवासी अरुण अशोक पवार (वय ३६) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक ३० मे २०२५ रोजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अरुण पवार हे आपल्या घराच्या टेरेसवरून अपघाताने खाली पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button