खेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वटपौर्णिमेसाठी मोफत वडाच्या रोपांचे वाटप.

वडाची फांदी न मोडता वडाच्या रोपाची पूजा करण्याचे आवाहन

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज मोफत वच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची फांदी न मोडता वडाच्या रोपाची पूजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोफत वडाची रोपे वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी खेड शहर व तालुक्यातील सर्व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुकाध्यक्षा सौ. पुनम शेट्ये-पाटणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button