कोलंबोहून न्हावा शिवा येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग, या जहाजातील चार क्रू मेंबर बेपत्ता


कोलंबोहून न्हावा शिवा येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग लागली आहे. या जहाजातील चार क्रू मेंबर बेपत्ता आहेत. तर 5 क्रू मेंबर जखमी झाल्याचे समोर आले आहे.
या मालवाहू जगाजावर एकूण 22 क्रू मेंबर्स होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोचीपासून सुमारे 315 किमी अंतरावर जहाजाच्या अंडरडेटकमध्ये हा स्फोट झाल आहे.

अगोदर आग नंतर मोठा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार जहाजाच्या अंडरडेकमध्ये स्फोट झाला आहे. आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये अगोदर आग लागली. त्यानंतर या जहाजाच मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. मात्र या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button