
कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव येथे मंगला एक्सप्रेसच्या धडकेने तरूणाचा जागीच मृत्यू.
कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव येथे स्थानकानजिक मंगला एक्सप्रेसच्या धडकेने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घनश्याम सिंह (२८, सध्या रा. माणगांव, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव आहे.तो माणगांव येथील आपुलकी हॉटेलमध्ये कामाला होता. रविवारी सकाळच्या सुमारास रूळावरून जात असताना मंगल एक्सप्रेसची त्याला दडक बसली. ही बाब रेल्वे कर्मचार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर माणगांव पोलिसांना कळविण्यात आले. माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. माणगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.www.konkantoday.com