
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील दुर्घटनेत जखमी ओम मोरेच्या प्रकृतीत सुधारणा.
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे विद्युत तारेचा स्पर्श होवून मृत झालेल्या हृदया मोरे यांच्या पार्थिवावर गुरूवारी रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओम मोरे याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. शुक्रवारी महावितरण कंपनीने मोरे कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत सुपूर्द केली.हृदया मोरे या गुरूवारी सकाळी घर परिसरात वावरत असताना तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आजीला वाचविण्यासाठी गेलेला नातू ओम मोरे हा जखमीही झाला. ओमला तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने ओमला घरी सोडण्यात आले.हृदया यांच्या पार्थिवावर गुरूवारी रात्री ८.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदया याच्या अचानक निधनाने मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.www.konkantoday.com




