मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजातील उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम सुरू.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरात उड्डाणपुलाच्या कामाला आता गती येवू लागली आहे. पुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम शुक्रवार ६ जूनपासून सुरू केले आहे. या उड्डाणपुलावर ३९२ गर्डर बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्यावतीने देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गाच्या लांजा ते वाकेड अशा १३ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील लांजा टप्प्यात शहरातील संत निरंकारी सत्संग भवन ते एसटी डेपोपर्यंत उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी ९.७५ मीटर तर रूंदी २५ मीटर इतकी आहे. या पुलासाठी एकूण ५० पिलर उभारण्यात आले असून लांजा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथून या पुलाचे काम सुरू आहे. यामध्ये पुल उभारणीत २० मीटरचे गाळे देण्यात आले असून पिलरची उंची साडेपाच मीटर आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button