दोघांकडूनही एक पाऊल मागे, सुरेश धस यांच्या माफीनंतर प्राजक्ता माळी कडून व्हिडिओ शेअर.

भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर एकच घमासान उठलं. अभिनेत्री प्राजक्ता माळीवर प्रचंड टीका झाली.झालेल्या टीकेनंतर प्राजक्ता माळीने महिला आयोगात धाव घेत तक्रार केली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्याचप्रमाणे पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी करत संपूर्ण प्रकराचा निषेध केला. आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी मागितली. झालेल्या संपूर्ण प्रकरणानंतर दोघांकडून एक पाऊल मागे घेण्यात आलं आहे.

सुरेश धस यांच्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर केला आहे. या प्रकरणावर प्राजक्ताकडून पडदा टाकण्यात आला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.प्राजक्ता माळीने म्हटलंय, “तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्याक्षणापासून ते आता पर्यंत मी आणि माझे कुटुंबीय आणि शेकडो फोन कॉल मेसेज सोशल मीडिया टॅग्स रिसिव्ह केलेत. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला. पाठिंबा दिला गेला, समर्थन दिलं गेलं. त्यामुळे आम्हाला फार बळ मिळालं. समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button