
दापोली पोलीस ठाणे मार्फत “गोवंश जनावरांची सुटका”.एका इसमास घेतले ताब्यात.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने दिनांक 07/06/2025 रोजी दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ला येथे एका घरामध्ये गोवंश जनावरे कत्तल करण्याकरिता कोंडून ठेवले असले बाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाल्या वरून या गुप्त बातमीची शहानिशा करून मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.
जयश्री गायकवाड यांना अवगत करून दापोली पोलीसांनी या ठिकाणी छापा मारला असता गोठ्यामध्ये जखडून बांधून व कोंडून ठेवलेले बैल, गायी व छोटी वासरे मिळून आली.याच प्रमाणे मोहल्यामध्ये हानीफ शेख अली मालवणकर याचे घरालगत असणाऱ्या जंगल युक्त भागात देखील अधिक पाहणी करीत असताना 3 गोवंश जनावरे कत्तल करण्याकरिता जखडून बांधून ठेवली असल्याचे दिसून आल्याने गोठ्यातील व जंगलयुक्त भागातील एकूण 10 बैल, 15 गाई व 4 वासरे अशा सर्व गोवंश जनावरांची तात्काळ सुटका करून व त्याना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा करण्यात आली आहेत, या घटनेचे अनुषंगाने आरोपी हनीफ शेख अली मालवणकर यास ताब्यात घेतले असून त्याचेसह त्याचा मुलगा तसेच भाऊ या तीनही आरोपींविरोधात दापोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.ही कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे, व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.1) पो.उ.नि. श्री. राजकुमार यादव,2) पो.उ.नि. श्री. महेश पाटील,3) पो.उ.नि. श्री हेमराज निर्मळ,4) पो.उ.नि. श्री मिलिंद चव्हाण 5) पो. हवा. श्री. अभिजीत पवार, 6) पो.हवा. श्रीमती. रूपा ढोले, 7) पो.हवा. श्रीमती. साक्षी गुजर, 8) पो.कॉ / श्री. विकास पवार, 9) पो.कॉ / श्री. विजयंन सातारडेकर, 10) पो.कॉ / श्री. सुरज मोरे,11) पो.कॉ / श्री. विशाल कदम, 12) पो.कॉ / श्री. निलेश जाधव व 13) पो.कॉ / श्री. अतुल सापते.