
जिल्ह्यात गुरांची अवैध वाहतूक पकडली; कायदेशीर कारवाई सुरू.
अफवा पसरवू नका जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे जनतेला आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यात अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतही कारवाई करण्यात आली आहे.आज दापोली येथेही 28 गुरांची वाहतूक करताना पकडण्यात आले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोपी नाही अटक करण्यात आली आहे मात्र या संदर्भात कोणीही जिल्ह्यात अफवा अथवा चुकीचे मेसेज पसरवून रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग करू नये पोलीस योग्य ती कारवाई करीत आहेत त्यांना सहकार्य करावे चुकीचे मेसेज केलेले पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशाराच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे.