क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाण्याने चिपळुणातील वृद्धाला ६ लाखांचा ऑनलाईन गंडा.

क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाण्याने येथील वृद्धाला ६ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार २० मार्च रोजी घडला. या प्रकरणी गुरूवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय हरी बापट (७२, परांजपे स्कीम, बहाद्दूरशेखनाका) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत बापट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले आयडीबीआय बँकेच्या चिपळूण शाखेत जॉईंट अकाउंट आहे. आपण फेसबूक या सोशल मिडियावर आलेल्या लाईफ टाईम क्रेडीट कार्डच्या जाहिरातीला क्लिक करून १९ मार्च २०२५ रोजी अर्जात ामहिती भरली होती. त्यानंतर २० मार्च रोजी आपल्याला अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन येवून क्रेडीट कार्ड पाहिजे का, असे विचारले. त्यामुळे आपण त्याला एटीएम कार्डची सर्व माहिती, गोपनीय पीन सांगितला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने आपले खाते, एफडीमधून ६ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button