खेड येथे सापडलेला गांजा

ओरीसामधून खरेदी केलेला खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २ किलो गांजा वाहतूक प्रकरणी केलेल्या कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजीत विचारे (२०, रा. नालासोपारा, सध्या शिवतर, दत्तवाडी, खेड), रविंद्र प्रेमचंद खेरालिया (२५, उत्तर प्रदेश, सध्या रा. मिरारोड ठाणे) यांची रवानगी ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. गांजा खरेदीचे ओडीशा कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गांजा विक्रीतील मुख्य सूत्रधार ओडीशाचा असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे मुंबई येथून एकजण शहरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी सापळा रचला असता कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजीत विचारे याला १ किलो ४४ ग्रॅम वजनाचा गांजा व यामाहा आर १५ या स्पोर्टस बाईकसह रंगेहाथ पकडले. तुतारी एक्सप्रेसमधूनही गांजा विक्रीसाठी एकजण येणार असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात रविंद्र प्रेमचंद खेरालिया अडकला. त्याच्याकडूनही १ किलो २२ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता ओडिशातून गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button