
राजापूर तालुक्यातील सागवे, नाखरे येथे उत्खननात सापडली ऐतिहासिक तोफ.
राजापूर तालुक्यातील सागवे-नाखरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असून अद्यापही त्या पुरातन तोफेची दखल पुरातत्व विभागाने न घेतल्याने आता येथील ग्रामस्थांनी ही तोफ गावातच एका ठिकाणी ठेवली आहे. गेली कित्येक दशके जमिनीच्या पोटात असणारी ही तोफ सापडल्याने आता राजापूर तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे.सध्या ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून यामुळे शिवकालीन इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com