
मिरजोळे पाटीलवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देणार्या बोलेरो चालकावर गुन्हा.
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देवून जखमी करणार्या बोलेरो चालकावर शहर पोलिसांत गुन दाखल करण्यात आला आहे. अपघाताची घटना २४ मे रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास घडली होती. संकेत मांडवकर असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. संकेत हा २४ मे रोजी दुचाकी (एमएच ०८ एवाय ७९९४) घेवून मिरजोळे ते केळ्ये असे जात होते. रात्रौ १२.४५ वाजण्याच्या सुमारास मिरजोळे पाटीलवाडी येथे वळणावर पांढर्या रंगाच्या बोलेरो गाडीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात संकेत हे जखमी झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com